January 1, 2009
नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!
आज १ जानेवारी २००९.नवे वर्ष,नवा दिवस!नवी आशा, काही नवीन संकल्प आणि आणखी नवीन बरेच काही..... तुम्हाला नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!!!गेल्या वर्षभरात अनेक चांगल्या-वाईट घटना घडल्या पण प्रामुख्याने लक्षात राहिलेल्या घटना म्हणजे जागतिक बाजारपेठेतील मन्दी आणि वर्षाच्या अखेरीस मुंबईवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला. या दोन घटनानी आपण हादरलो,भेदरलो पण आता पुन्हा नव्या उमेदीने उभेराहत आहोत...या उमेदीत इतके बळ येते कुठून? माझ्या मते आपण जी नवी आशा धरतो,नवीन वर्षासाठी काही संकल्प सोडतो,काही नवीन ध्येय ठरवतो,येणार्या या नवीन वर्षात काहीतरी चांगले घडेल असा आत्मविश्वास बाळगतो त्यामुळेच या उमेदीला बळ येते. नववर्षाचे जल्लोषात स्वागतही आपण यासाठीच करतो .या जल्लोषात फक्त तरूण पिढीच सामील नसते तर लहान मुलांपासून ते अगदी वृद्धा पर्यंत सगळेजण नववर्षाचे जल्लोषातच स्वागत करतात मात्र प्रत्येकाच्या स्टाइल वेगवेगळ्या असतात.माझ्याबद्दल सांगतो , माझा या नवीन वर्षातील फन्डा आहे आनंद!! आता आनंद कोणाला कशात मिळेल हे सांगता येत नाही पण मी मात्र छोट्या छोट्या गोष्टीतीलसुद्धा आनंद घेणार आहे. नाही म्हणजे काय असत आपण एखाद्या मोठ्या पगाराची नोकरी मिळाल्यावर मोठा आनंद मिळेल असा विचार करतो पण ती भल्या मोठ्या पगाराची नोकरी मिळवण्यासाठी ज्या विविध गोष्टी करतो, जे कष्ट करतो ते भलेही छोटे असतील पण त्यातून मिळणारा आनंद न घेताच आपण पुढे जातो आणि त्यातून मिळणार्या या समाधानाला मुकतो. म्हणून मी प्रत्येक गोष्ट आनंदाने उपभोगायची असे ठरवले आहे. तर मग तुम्हालाही हे वर्ष आनंदाचे आणि सुखासमृद्धीचे जावो ही सदिच्छा!!!
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment