April 3, 2009

गीतरामायण, एक स्वर्गीय आनंद.....

"स्वये श्री रामप्रभू ऐकती, कुश लव रामायण गाती" या ओळीपासून सुरू होणारा
गीतरामयणाचा प्रवास आपल्याला अक्षरशः संपूर्ण रामायणाचे दर्शन घडवून आणतो......
गदिमांची अप्रतिम शब्दरचना आणि बाबुजींनी दिलेली मधाळ चाल!!निव्वळ अप्रतिम!!!मला तर वाटतं हे कार्य त्या दोघांकडून प्रभू रामानेच करून घेतलं असावं.
गीतरामायण ऐकताना,रामायणातले सगळे प्रसंग अगदी आपल्या डोळ्यांसमोर घडत आहेत असं वाटत...विशेषतः "आकाशाशी जडले नाते धरणीमातेचे, स्वयंवर झाले सीतेचे" व्वा! आणि "पराधिन आहे जगति,पुत्र मानवचा" या गाण्यातुन तर खरोखर मानवी जीवनातील सत्य कळतं.
हे गीतरामायण म्हणजे एकप्रकारचा चमत्कारच म्हणावा लागेल,त्याकाळी जेव्हां रेडिओवरुन गीतरामयणाचे प्रसारण व्हायचे तेव्हां सगळे लोक घरीच रेडिओला कान देउन ऐकायचे,रेडिओला हार घालायचे,नमस्कार करायचे,अक्षरशः सगळे रस्ते ओस पडायचे.
या गीतरामयणातील कोणतेही गीत कधीही ऐका,ते तुम्हाला सुमधुरच वाटेल.खरोखर हे गीतरामायण अजरामर आहे.