दोन फुलांची कथा
अशी ही दोन फुलांची कथा
एक शिवाच्या पदी शोभाते
एक शवाच्या माथा
इथला निर्माल्य ही सुगंधी
तिथली माळ ही कुणी न हुंगी
इथे भक्तीचा वास फुलांना
तेथे नरक व्यथा
जन्म जरी एकाच वेलीवर
भाग्यामध्ये महान अंतर
गुळखोबरे कोणा
कुणाला मिळे पिंड पालथा
दोन फुलांचे एकच प्राक्तन
उच्च नीच हा भाग पुरातन
एक शिलेला देव मानते
एक पूजितें मृदा
निर्माल्य कुणी मंदिरातला
अर्पियला गंगा माईला
जरा पलीकडे स्मशानातला
पाचोळाही वाहत आला
फुलाफुलांची ओळख पटली
हसला जगत्नियंता
- कुसुमाग्रज
No comments:
Post a Comment