गेल्याच आठवड्यात मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याने केवळ आपला देशच नह्वे तर संपूर्ण जग हादरुनगेले.या हल्ल्याने अनेक गोष्टी उघड्या पडल्या,विशेष करून आपल्या राजकारणातील भोंगळपणा,बेफिकीरवृत्ती,आक्रमकतेचा अभाव इ.....दहशतवादी हल्ल्यानंतर सुरू झाले हीन दर्जाचे राजकारण.मग एकमेकांवरचे अरॉपप्रत्यारोप ते शहीद झालेल्या सैनिकाच्या कुटुंबीयांचा अपमान.हा सगळा तमाशा सुरू झाला.मात्र या सगळ्या धान्दलीत मुंबईकर न थांबता चालतच राहिला.....
पण आता बस्स खूप झाले!!!मुंबईकरांच्या स्पिरीटच कौतुक....ते कौतुक करून राजकारणातील मंडळी स्वतःच्या चुकांवर किंवा किंवा दोषांवर पांघरूण घालतात आणि मुंबईकरांना भुलवतात.पण ते ज्या स्पिरीटच कौतुक करतात,मुंबईकरांना ते स्पिरीट दाखवण्यावाचून पर्याय नसतोच(आणि आता तर आपल्या महाराष्ट्राच्या माजी गृहमंत्र्यानुसार'अशा मोठ्या शहरात एखाद दुसरे हल्ले होतच असतात....!!!')तेंव्हा मुंबईकरानी याची सवयच लावून घ्यावी असाच अप्रत्यक्ष संदेश यातून मिळतो....
खरंतर सर्वसामान्य मुंबईकरांना,चाकरमान्याना कोणताही घातपात होऊ देत पण लवकरात लवकर कामावर हजर व्हावच लागत....फुकट काहीही काम न करता नुसता सरकारी पगार घेणारे ते मंत्री थोडेच आहेत?? मुंबईकरांच्या या कृतीला काय म्हणावे स्पिरीट का सवय?नाही म्हणजे कोणताही दहशतवादी घातपात घडू देतपण त्याची काय आत्ता सवय झाली आहे ,ते तर आता नित्याचेच आहे अशा विचाराने मुंबईकर जर घराबाहेर पडत असतील आणि राजकारणी लोक त्याला 'स्पिरीट' म्हणत असतील तर माझ्या मते हा राजकारणाचा संपूर्ण, सपशेल पराभव आहे.........
No comments:
Post a Comment