December 1, 2008

भीती

आता फारशी जत्रा भरत नाही,
भरलिच तरी
मुलं पुन्ग्या विकत घेत नाहीत,
घेतात प्रकाशमान होताना
धडाडणारी बंदुक

मुलं कुठं खेळतात खेळपाणी
खेळतात 'युद्ध युद्ध '

बैठकीतल्या उश्या चा बांध रचून
पोरानी एकदा
माझ्यावरच रोखली स्टेनगन,
गोळीला घाबरलो नाही
पण चिमुकल्या डोळ्यांत
हिंस्रतेचा आविर्भाव पाहून,
हातातली खोटी बंदूक
कधीही खरी होण्याची भीती
मेंदूत आरपार घुसत गेली.

-दासू वैद्य.

No comments: